Pune News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी केली कारवाई ; गुन्हेगारांबरोबर वाढदिवस साजरा करणाऱ्या चार पोलिसांना केले निलंबित

•सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची तडकाफडकी बदली
पिंपरी-चिंचवड :- वाढदिवस साजरा करणं या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे.सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी, रात्रीच्या वेळी धिंगाणा करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाई करत वाढदिवस असलेल्या पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डंगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सांगवी पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच पोलीस कर्मचारी प्रवीण पाटीलने नियमांचे उल्लंघन करत धुमधडाक्यात पोलीस सहकाऱ्यांसह वाढदिवस साजरा केला.फायर गन, डोक्यावर बड्डेचा ताज असलेला टोप, ड्रोनने केलेलं शूटिंग अगदी चित्रपटाला साजेशा असा वाढदिवस प्रवीण पाटीलने साजरा केला होता.त्यातच हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांसोबत हा वाढदिवस साजरा केल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. पोलिसांच्या या कर्तबगारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिसांनी पोलिसांनीच नियमाची पायमल्ली केले असल्यामुळे हे कठोर पावले उचलत चार पोलिसांना पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलं आहे अशी माहिती पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे.