Uncategorized

Nilesh Lanke NCP : अजित पवार गटाला मोठा धक्का, “हा”आमदार सोडले, शरद पवार गटात प्रवेश?

•अजित पवार गटाला मोठा फटका बसला आहे. नीलेश लंके हे त्यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात असताना त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.

मुंबई ‌:- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात सामील होणार आहेत. नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवारांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जात होते. Nilesh Lanke NCP

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. याआधी अहमदनगरची जागा खूप चर्चेत होती. खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार निलेश लंके यांच्यात लडाई होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात नीलेश लंके यांच्या पत्नीही सक्रिय दिसत आहेत. Nilesh Lanke NCP

नीलेश लंके यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थित सोमवारी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती. आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्याकडून नगर दक्षिणमधून लंके यांची उमेदवारी देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, खा. सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखेही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. Nilesh Lanke NCP

कोण आहेत आमदार नीलेश लंके?

नीलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला. Nilesh Lanke NCP

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात दरम्यान, नीलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली. वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली. पण 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली. Nilesh Lanke NCP

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0