Ravindra Dhangekar : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे गृहमंत्री फडणवीस यांना पत्र
•आमदार रवींद्र धंगेकर यांच्या थेट पुणे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, पुण्यातील रोज एक पोलीस ठाण्यासंदर्भातील काळाबाजार बाहेर काढणार
पुणे :- कार अपघातातील अल्पवयीन तरुणाने दोन जणांना उडवल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुरुवातीपासूनच पुणे पोलीस यांना धारेवर धरले आहे. आता थेट त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जे स्वतः बिल्डरच्या पाकिटावर काम करताय का कसा गुन्हा कारवाई करणार ?.. असं गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे त्यानंतर त्यांनी पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचा काळाबाजार रोज एक बाहेर काढणार असल्याचे म्हणाले आहे.
रवींद्र धंगेकर यांनी पब मधील अल्पवयीन तरुणाचा फोटो ट्विट करा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत पुणे पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…?
असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.
रवींद्र धंगेकर यांनी थेट पोलिसांचे नाव घेत हप्ते गोळा करत असल्याचा आरोप
कल्याणी नगर परिसरातील हॉटेल आणि पब्स च्या मधून कुठल्या आणि कुठल्या कोणत्या पोलिसाला हप्ता दिला जातो यांचे नाव घेत धंगेकर म्हणाले की,दिवस 1ला – मुंढवा पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात.सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील.पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन.जय हिंद ,जय पुणेकर..!