मुंबई

Mahendra Sheth Gharat : कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या कडून गुणवंत विध्यार्थ्यांचे अभिनंदन!!

पनवेल : JBSP संस्था संचलीत, तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण- कोपर शाळेतील इयत्ता १२वी मध्ये प्राविण्य मिळवीलेल्या विद्यार्थ्यांचा रयत शिक्षण संस्थेचे जनरल कौन्सिल मेंबर कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर माताजी स्व. भागुबाई चांगु ठाकूर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कामगार नेते.


महेंद्र घरत Mahendra Sheth Gharat यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत, शाळेतील शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते. महेंद्र घरत यांनी गुणवंत विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या बरोबर आपल्या शाळेचे व आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करा, उच्च शिक्षण घ्या ,शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे,जो ते पितो तो डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही असे ते याप्रसंगी म्हणाले.

Web Title : Mahendra Sheth Gharat Congratulate Student

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0