पुणे
Trending

Daund News : डॉक्टर अपूर्वा हुंबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी प्रदान

दौंड तालुका प्रतिनिधी, ता. ३ वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित समजली जाणारी एमबीबीएस ही पदवी अपूर्वा अनिल हुंबे यांनी नुकतीच प्राप्त केली आहे.

अपूर्वा अनिल हुंबे या उरुळी कांचन येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर उरुळी कांचन येथे तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे झाले आहे. लोणी काळभोर येथील एमआयटी गुरुकुल येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर एमबीबीएस चे शिक्षण अश्विनी मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर सोलापूर येथून यशस्वीपणे पूर्ण केले आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला असून त्या प्रथम श्रेणीमधून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशामध्ये स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, महात्मा गांधी विद्यालय, एमआयटी गुरुकुल, अश्विनी मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर यामधील शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य व आई वडिलांची प्रेरणा यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. डॉ. अपूर्वा हुंबे यांचे आई व वडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्या आई स्वाती हुंबे ( माने ) या यवत मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणकोबावाडी या शाळेत मुख्याध्यापिका आहेत तर वडील अनिल हुंबे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत स्टेशन येथे प्राथमिक शिक्षक आहेत. डॉ. अपूर्वा हुंबे यांच्या यशाबद्दल यवत व उरुळी कांचन परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0