Rahul Kul : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांचे पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदन
Rahul Kul On Daund Police : दौंड तालुक्यासह बारामती, इंदापूर व शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनची चौकशी करण्याचे आमदार राहुल कुल यांची मागणी
( दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी )
Daund News : दौंड, ता. ४ दौंड तालुक्यासह बारामती, इंदापूर व शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनची Drone चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल Rahul Kul यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस Daund Police अधिक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे तसेच काल सायंकाळी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून केली आहे. Daund Latest News
याबाबत आमदार कुल MLA Rahul Kul यांनी दिलेल्या निवेदनात ते म्हणाले आहेत कि, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासह बारामती, इंदापूर व शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये मागील १० ते १५ दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात उडणारे ड्रोन हे नागरिकांच्या काळजीचा व चिंतेचा विषय बनत चालले आहेत. हे ड्रोन हेरगिरी करीत आहेत काय असा संशय नागरिकांच्या मनात येत असून, यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. आकाशात उडणारे हे ड्रोन काल परवा रात्रीच्या वेळी माझ्या देखील निदर्शनास आले असून, याची चौकशी करून बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. Daund Latest News
Web Title : Rahul Kul : Daund Taluka MLA Rahul Kul’s statement to Pune Collector and Pune Rural Superintendent of Police