देश-विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधींनी राजीनामा दिला, आता या जागेवरून खासदार राहतील

Priyanka Gandhi to contest from Wayanad Lok Sabha seat : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून बाहेर पडल्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

ANI :- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केरळमधील वायनाड (Wayanad Lok Sabha) आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली यांमधील एक जागा निवडली. वायनाडची जागा रिकामी करण्याबाबत त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला कळवले आहे.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून खासदार म्हणून कायम राहण्याबाबत आणि वायनाडची जागा सोडण्याबाबत अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पत्र पाठवले आहे.

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांना यापैकी एक जागा सोडावी लागली होती. काँग्रेसने सोमवारी (17 जून) मोठी घोषणा केली होती की, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहतील आणि प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे.

पहिल्यांदाच असेल का?

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झाल्यास त्या पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत प्रवेश करणार आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी घराण्यातील हे तीन सदस्य एकत्र संसद सदस्य होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “मी वायनाडच्या लोकांना माझा भाऊ राहुल गांधी यांची अनुपस्थिती जाणवू देणार नाही. मी कठोर परिश्रम करेन आणि प्रत्येकाला संतुष्ट करण्याचा आणि चांगला प्रतिनिधी बनण्याचा माझा प्रयत्न असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0