देश-विदेश
Trending

Delhi News : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, जामा मशीद मेट्रो स्टेशनवर गोंधळ घालणाऱ्या 10 जणांना अटक

Jama Masjid Metro Station : जामा मशीद मेट्रो स्थानकावर झालेल्या गोंधळाबाबत डीएमआरसीने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी बीएनएस कलम 132 आणि 221, कलम 59 आणि डीएमआरसी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

ANI :- 13 फेब्रुवारी रोजी शब-ए-बरात दरम्यान जामा मशीद मेट्रो स्टेशनच्या AFC गेटवर गोंधळ घातल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. Jama Masjid Metro Station सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.15 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तरुणांचा जमाव मेट्रो स्कॅनिंग मशीनला पंच मारून पास करण्याऐवजी उडी मारून स्टेशनमधून बाहेर पडत आहे. डीएमआरसीकडून तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी बीएनएस कलम 132 आणि 221, कलम 59 आणि डीएमआरसी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

शब-ए-बारातच्या दिवशी जामा मशीद मेट्रो स्टेशनवर तरुणांच्या जमावाने गोंधळ घातला. एवढंच नाही तर गोंधळादरम्यान ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर मोठ्या संख्येने तरुणांनी उड्या मारल्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळत आहे.सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केले होते.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने या घटनेबाबत ट्विटरवर म्हटले होते की, “सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही प्रवासी एएफसी गेटमधून उडी मारत आहेत. त्या संदर्भात, DMRC कळवू इच्छिते की ही घटना 13 फेब्रुवारी 2025 च्या संध्याकाळी व्हायलेट लाइनच्या जामा मशीद मेट्रो स्टेशनवर घडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0