•Bharat Jodo Nyay Yatra काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पालघर जिल्ह्यात असून यादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली
पालघर :- राहुल गांधी यांचे भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रात असून आज पालघर मध्ये राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. 3 टक्के असणाऱ्या लोकांच्या हातात न्यायव्यवस्था, मीडिया, पैसा, कॉर्पोरेट या सर्व गोष्टी त्यांच्या हातात आहे, असे म्हणत 88% लोकांना प्रभूचे गुणगाण करावे आणि उपाशी मरत रहावे, असे सरकारकडून सांगितले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी पालघरमधील सभेत केला आहे. Rahul Gandhi
नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण ते ओबीसी नाहीत, ते जनरल कोट्यातले होते, गुजरात सरकारने कायदा बदलला त्यानंतर ते ओबीसी झाले. पण महत्वाचा प्रश्न आहे की, नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले? जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची लूट सुरु आहे.भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पालघर जिल्ह्यातील वाडा येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानमध्ये 88 टक्के लोकसंख्या ओबीसी, दलित, आदिवासी, मागास समाजाची आहे परंतु विविध क्षेत्रातील त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे
भाजप सरकार मात्र तुम्हाला म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, और भूके मर जावो’ असा प्रहार काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. Rahul Gandhi
राहुल गांधी यावेळी जोरदार टीका करताना दिसले. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास आदिवासींना जमीन पट्टे दिले जातील, जेथे 50 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे तेथे 6 वे शेड्युल लागू केले जाईल म्हणजे स्थानिक सरकार, गावाच्या हातातच सर्व अधिकार असतील. प्रशासन व विविध क्षेत्रातील ही विषमता दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची गरज आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा मुक्काम भिवंडीत आहे आणि उद्या 16 तारखेला मुंबईत ही यात्रा दाखल होईल. Rahul Gandhi