Thane Bank Faud : SBI बँकेचा प्रतिनिधी असल्याच्या बतावणीने महिलेची 7.50 लाखांची फसवणूक

Thane Fake SBI Bank Fraud : एसबीआयचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून मदत करतो असे आमिषाने एका महिलेची 7 लाख 50 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस समोर आला आहे.
ठाणे :- मदत मिळवून देतो अशी बतावणी करत महिलेची 7 लाख 50 हजारांची फसवणूक Thane SBI Fraud करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी चितळसर पोलिसांकडून Chitalsar Police अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क) आणि 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीने तक्रारदार महिलेच्या आईला एसबीआय बँकेचा प्रतिनिधी असल्याची बतावणी केली होती. Thane Fraud News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी 49 वर्षीय महिला गृहिणी असून ठाणे पश्चिम येथे राहत आहे. त्यांच्या आईला एका अनोळखी व्यक्तीने एसबीआय चा प्रतिनिधी म्हणून बोलत असल्याचे सांगून मदत करीत असल्याचे दर्शवून त्यांच्या खात्यातून सात लाख 50 हजार रुपयाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वेंगुर्लेकर करत आहे. Thane Fraud News