Pune Traffic | वाहतूक कोंडीला पुणेकरांचा बेशिस्तपणा जबाबदार ! मनपाकडूनही रस्त्यांची आवश्यक देखभाल नाहीच
Pune Traffic
- Pune Traffic | वाहतूक समस्येसाठी वाहतूक पोलिस ‘टार्गेट’
पुणे, दि. २२ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Pune Traffic | जगभरात वेगाने विस्तारणारे शहर म्हणून प्रसिद्ध असणारे पुणे त्याच्या वाहतूक समस्येसाठीही तेवढेच कुप्रसिद्ध होत आहे. आयटी क्षेत्रातल्या बऱ्याच कंपन्यानी याचा धसका घेत पुण्यातून इतरत्र आपला मोर्चा वळवला आहे. वाहतूक समस्येचा तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना देखील यात सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणाने आता वाहतूक कोंडीला पुणेकरांचा बेशिस्तपणा व पुणे मनपाकडून रस्त्याची आवश्यक देखभाल होत नसल्याची बाब समोर आली आहे. Pune Traffic
शहराचा विकास होत असताना त्याची उपनगरे शहराला अधिक समृद्ध करत असतात. उपनगर आराखडा मंजूर करताना महापालिका प्रशासन अनेक भविष्यकालीन पाणी, कचरा, साफ-सफाई, रस्ते आणि वाहतूक समस्येचा विचार करून ‘डीपी’ डेव्हलोपमेंट प्लॅन तयार करते. प्रत्यक्षात ठरलेल्या गोष्टी फक्त कागदावरच राहतात आणि समस्या उग्र रूप धारण करतात. याचा अनुभव पुणे शहरात सिंहगड रोड, वारजे, हडपसर, कोंढवा, वाघोली, चंदनगर, चतुःशृंगी परिसरात येतो. येथील वाहतूक कोंडीने जीव कासावीस होत आहे.
पुणे शहराला वाहतुक समस्येने ग्रासले आहे. आखूड रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांवरील अतिक्रमण, दुतर्फा पार्किंगमुळे तुंबलेले रस्ते, ठिकठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासाठी रस्त्याची अडवणूक, पावसाळ्यात ठिकठिकाणी साठणारे पाणी वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत आहे. या सोबतच मी पुणेकर, मला कायद्याची काय भीती? बेशिस्तपणे वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणे यात गैर काय असा समज देखील वाहतूक कोंडीसाठी जबाबदार आहे. दुचाकीवरून जात असताना सिग्नल जम्प करणे, नो एंट्रीतून जाणे, सिग्नलची वाट न पाहता समोर सुरु असलेल्या वाहतुकीच्या मधून जाण्याचा प्रयत्न करणे, रास्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग न करणे, वाहतूक कोंडी झाली असताना वाहन पुढे काढण्यासाठी लाईन ब्रेक करणे अशा बेजबाबदारपणा पुणेकर करत आहेत.
वाहतूक समस्येसाठी वाहतूक पोलिस ‘टार्गेट’
वाहतूक समस्येसाठी वाहतूक पोलिसांना नेहमीच लक्ष्य केले जाते. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करणे आणि वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यावर कारवाई करणे या गोष्टी पोलिसांच्या अखत्यारीत आहेत. पण रस्त्यावरील खड्डे, पार्किंग व्यवस्था, अतिक्रण यासारख्या गोष्टी मनपाकडून हाताळल्या जातात. मनपा प्रशासनातील कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविताना दिसणार नाहीत पण वाहतूक पोलीस मात्र आपले कर्तव्य म्हणून वाहतूक कोंडीच्या तोंडावर उभा राहून त्याला तोंड देत असतो. रस्त्यावर पोलीस दिसतो म्हणून तोच जबाबदार असा चुकीचा समज नागरिकांकडून केला जातो.
शहरात मास्टर प्लॅन राबविण्याची आवश्यकता
वाहतूक कोंडीतून सुटका करून घ्यायची असेल तर आता मास्टर प्लॅन शिवाय गत्यंतर नाही. ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीचे पॉईंट ठरवून तेथील रस्ता रुंदीकरण करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागणार आहेत. सोबतच दुसऱ्या शहरातून उपनगरांमध्ये येणासाठी ओव्हरब्रीज तत्परतेने तयार करावे लागणार आहेत. नगर रोडवरील ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी शिक्रापूर ते शिवाजीनगर ओव्हरब्रीज तयार करणे आवश्यक आहे. तर सोलापूर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी लोणी काळभोर ते कॅम्प ओव्हरब्रीज आवश्यक आहे. तसेच चाकण ते नाशिक फाटा ओव्हरब्रिज आवश्यक आहे.
मेट्रोचे जाळे वाढविण्याची गरज
पुणे मेट्रो फक्त काही भागापुरतीच मर्यादित आहे. शहरातील सर्वच उपनगरांमध्ये मेट्रो पोहोचणे आवश्यक आहे.