Pune Traffic Change | महाशिवरात्री निमित्त पुण्यात वाहतुकीत बदल : वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार
Pune Traffic Change
पुणे, दि. ७ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Traffic Change | Traffic changes in Pune on the occasion of Mahashivratri: Deputy Commissioner of Transport Rohidas Pawar
महाशिवरात्री निमित्त तारकेश्वर मंदिर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असलेने येरवडा वाहतूक विभागातील पर्णकुटी चौक येथील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. आज याबाबत वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार (Traffic DCP Rohidas Pawar) यांनी आदेश काढून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन केले आहे. (Pune Traffic Change, traffic updates pune)
कोरेगाव पार्क बंड गार्डन कडून येणारी वाहतूक बंद
पुण्यातून नगररोड एअरपोर्ट कडे जाणारी वाहनांना तारकेश्वर चौकातून डावीकडे वळून शादलबाबा चौकातून उजवीकडे वळून आंबेडकर चौक येथे उजवीकडे वळून नगररोड व एअरपोर्ट कडे जातील.
संगमवाडी कडून कोरेगाव पार्क व नगररोडकडे जाणारी वाहतूक बंद
संगमवाडी कडून नगररोड व कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहने शादलबाबा चौकातून सरळ आंबेडकर चौक व सरळ नगररोड व उजवीकडे वळून गुंजन चौकातून कोरेगाव पार्ककडे जातील.
चंद्रमा चौकातून नगर रोड व कोरेगाव पार्क वाहतूक बंद
खडकीकडून येणारी वाहने चंद्रमा चौकातून नगररोड किंवा कोरेगाव पार्क याठिकाणी जाणारी वाहने हि चंद्रमा चौकातून डावीकडे वळून आळंदी जंक्शन, सरळ आंबेडकर चौक सरळ नगररोड व कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहने हि गुंजन चौकातून उजवीकडे वळून पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्क कडे जातील.