मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime News : फॉरेन दूर पॅकेज क्लब मेंबरशिपच्या नावाने फसवणुक करणाऱ्या कंपनी संचालकांना गुन्हे शाखा, मुंबई कडून अटक

Fake Foreign Tour Scam : पोलिसांकडून नागरिकांना आवाहन, पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक

मुंबई :- “यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमीटेड” या फॉरेन दुर पॅकेज सेवा देणा-या कंपनीची स्थापना करुन, कंपनीमार्फत मुंबई व इतरत्र विविध ठिकाणी सेमीनारचे आयोजन करुन, आमंत्रित केलेल्या नागरिकांना सवलतीच्या दरात फॉरेन दुर पॅकेजचे अमिष दाखवून, त्यांच्याकडून क्लब मेंबरशीकरीता लाखो रुपये घेवुन, त्यांना कोणतीही सेवा न पुरविता त्यांची फसवणुक करीत असल्याबाबतची तकार गुन्हे शाखा, मुंबई येथे प्राप्त झाली होती, नमुद तकारीच्या अनुषंगाने घाटकोपर पोलीस 409,420,34 भादवि अन्वये गुन्हे नोंद झाले असून, घाटकोपर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आलेल्या गुन्हयाचा तपास गुन्हे घटक -3 गुन्हे शाखा प्रकटीकरण., मुंबई . कलम 409, 420, 34 भादवि अन्वये तपास सुरू केला होता. Fake Foreign Tour Scam

“यात्री क्लब ऑफ हॉलिडेन प्रायलेट लिमीटेड” कंपनी गार्फत हॉटेलमध्ये अयोजीत केलेल्या सेमीनारद्वारे सवलतीच्या दरात फॉरेन टूर पॅकेजचे अमिष दाखवून, घाटकोपर पोलीस ठाण्याच्या गुन्हयातील फिर्यादी यांचेकडून 06 लाख 70 हजार साकिनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हयातील फिर्यादी यांचेकडून 5 लाख 11 हजार 800 रुपये स्विकारून, त्यांची फसवणूक केल्याचे समजले. गुन्हवाच्या तपासात “यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमीटेड” कंपनीते संचालक व गुन्हयातील मुख्य आरोपी यांनी साकिनाका, अंधेरी या ठिकाणी सुरु केलेली कंपनीची 03 कार्यालये व स्वतःचे संपर्क क्रमांक बंद करुन पळून गेल्याचे समजले. बातमीदार यांच्याकडून प्राप्त माहिती व केलेल्या तांत्रिक तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी हिमांशु तिवारी हा गोरखपूर, उत्तरप्रदेश येथे असल्याचे समजल्याने त्या ठिकाणी जावून आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात गुन्हयातील इतर पाहिजे आरोपी नोमान कैंसर हा अंधेरी, मुंबई येथे असल्याचे समजल्याने, त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. या गुन्हयात दिनांक 06 मार्च 2024 रोजी अटक करण्यात आली असून गुन्हयाचा तपास कक्ष-3, गुन्हे प्रकटीकरण शाखा मुंबई हे करीत आहेत.

अटक आरोपीचा तपशील

१) हिमांशु अश्वनी तिवारी, (27 वर्षे), रा.विं. गोरखपुर, राज्य उत्तप्रदेश
2) नोमान जुबेर अहमद कैंसर, वय (28 वर्षे),
रा.टि. कसुंबी, राज्य उत्तप्रदेश

पोलीसांकडून नागरिक आवाहन

गुन्हयाच्या तपासात अटक आरोपी यांनी अशाचप्रकारे इतर 12 ते 15 नागरीकांची देखील फसवणुक केल्याने निष्पन्न झाले असून, सदस्बाबत अधिक तपास सुरु आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नमुद कंपनी अथवा अटक आरोपी यांचेकडुन त्यांची फसवणुक झाली असल्यास त्यांनी गुन्हे शाखा, कक्ष-03 लोअर परेल, मुंबई कार्यालयाशी संपर्क साधावा, गुन्हे शाखा, मुंबई ने केलेल्या कामगीरीमुळे, नमूद आरोपीकडून नागरीकांच्या भविष्यात होणा-या फसवणुकीस प्रतिबंध करण्यात यश आले आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar), विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे व सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य) चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली का -3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सगीर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत सिरसाट, गणेश गोरेगांवकर, पोलीस हवालदार विनोद परब, रविंद्र देवार्डे, वैभव गिरकर, युवराज देशमुख, पोलीस शिपाई विकास चव्हाण व राहुल पाटील यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0