- गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून १० मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द
पुणे, दि. १२ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर
Pune Police News | साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा अर्थातच विजयादशमी दिवशी पुणे पोलिसांनी नागरिकांना खुश करणारी भेट दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून गहाळ मोबाईलचा शोध घेत तब्बल १० तक्रारदारांना ऐन दसऱ्या दिवशीच मोबाईल भेट देण्यात आली आहे.
गुन्हे शाखा, युनिट-३ कडील TAW चे काम पाहणारे पोलीस हवालदार संजीव कळंबे यांनी CEIR या पोर्टलवरून परिमंडळ 3 कडील पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले मोबाईल यांची माहिती घेतली.. ते मोबाईल पोर्टलवर चालू असलेल्या बाबत दिसल्याने त्यांचे मोबाईल एस डी आर काढले. सदरचे मोबाईल हे सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यात चालू होते,. संबंधित वापरत्या व्यक्तींना सदरचे मोबाईल हे गहाळ झालेले आहेत त्याबाबत तक्रार दाखल असून ते जमा करा असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्याकडून सदरचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. Pune Police News
मोबाईल खालील फिर्यादी यांना ताब्यात देण्यात आले
१) दिपाली निशिकांत मोकाशी
२) प्रतीक अनिल शेटे
३) विकास तुळशीराम चोरगे
४) संध्या शिवाजी पाटील
५) शुभम सुभाष शितोळे
६) योगेश विक्रम कसबे
७) राज यशवंत हरियण
८) आकाश अरविंद लांडे
९) श्वेता सिंग
१०) पूजा कासार.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-३ चे वपोनि रंगराव पवार, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, इसाक पठाण व सुजित पवार यांचे पथकाने केली आहे..