Uncategorized

Alandi Tree Plantation : आळंदी म्हातोबाची येथे वृक्ष लागवड करून केले अस्थींचे विसर्जन

Alandi Tree Plantation News : अस्थिविर्जन प्रचलित पद्धतीप्रमाणे नदीपात्रात करतात. मात्र आळंदी म्हातोबा येथील तरुण मागील चार वर्षापासून नदीच्या पाण्यात अस्थींचे विसर्जन न करता त्या अस्थी खड्डयात विसर्जित करून त्यावर झाड लावत आहेत. त्यानुसार आठवण राहावी म्हणून चिंचेचे झाड लावले व नियमानुसार अंत्यविधी झाल्यानंतर सुदर्शन शिवरकर यांनी पर्यावरणाचा विचार करून एक आदर्श उपक्रमाला साथ दिली. सध्या वाढते तापमान व पाणी प्रदूषण त्यामुळे वाढत चाललेले विविध आजार याची जाण असल्याने येथील तरुणांनी पर्यावरण जपले जावे, यासाठी वृक्षारोपणाचा Tree Plantation उपक्रम हाती घेतला आहे. Pune Breaking News

याला परिसरात प्रतिसादही मिळत आहे. शिवरकर कुटुंबियातील पत्नी लताबाई शिवरकर, मुलगा सुदर्शन शिवरकर तसेच मुलगी शुभांगी होले यांनी सामाजिक जाणिवेतून या उपक्रमाला प्रतिसाद देत घराजवळ वृक्ष लावून अस्थी विसर्जित केली. प्रवाही पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे आणि वृक्ष लागवड व्हावी, यासाठी पंचक्रोशीत रक्षाविसर्जन रानातच करुन वृक्ष लागवड चळवळ सुरू आहे. Pune Breaking News

दरम्यान, या कामासाठी पर्यावरण समितीचे सदस्य संतोष शिवरकर, रोहित शिवरकर, ओंकार शिवरकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, प्रकाश शिवरकर माऊली जवळकर, गणेश शिवस्कर, किरण होले, मंगेश भागवत, सुमेध होले, स्वप्नील शिवरकर, तेजस शिवरकर, दिलीप शिवरकर, पार्थ शिवरकर, डॉ. रसिका शिवरकर, ज्योती घुमटकर, सायली बोराटे, नंदाताई आल्हाट, संगिता बोरावके, सारिका भागवत व आप्तेष्ट नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. Pune Breaking News

सायली शिवरकर (उपसरपंच,आळंदी म्हातोबा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0