क्राईम न्यूजपुणे

सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर याच्याकडून खंडणी विरोधी पथकावर गोळीबार : पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी केला बचावासाठी गोळीबार घटनेन खळबळ

Pune Crime News Pune Crime Branch Arrested Wanted Criminal Navnath Wadkar : गुन्हेगाराने पुणे पोलिस पथकावर पिस्तूलातून गोळी झाडली

पुणे :- दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेल्या (Navnath Wadkar) गुन्हेगाराचा पाठलाग करताना गुन्हेगाराने पुणे पोलिस पथकावर Pune Crime Branch पिस्तूलातून गोळी झाडली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गुन्हेगारावर तीन गोळ्या झाडल्या. यानंतर त्याच्या दुचकीला गाडी आडवी घालून त्याला साथीदारासह जेरबंद केले. मुळशी तालुक्यातील मुठा गाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही थरारक घटना घडली. Pune Crime News

नवनाथ निलेश वाडकर (Navnath Wadkar) (18 वर्ष रा. जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत. केतन साळुंखे स्वारगेट पोलीस ठाण्यात ( Swargate Police Station ) दाखल असलेल्या पत्रकारावरील हल्यातील आरोपी आहे.नवनाथ वाडकर याच्यावर अल्पवयीन असतानाच अनेक गुन्हे (Criminal On Pune Police Records) दाखल होते. 307 दाखल होता. नुकताच तो दोन महिन्यापूर्वी सज्ञान झाला होता. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध 399 दाखल होता. Pune Crime News

या गुन्ह्यात फरारी असल्याने त्याला पकडण्यासाठी खंडणी विरोधी पथकाकडून टीम मुठा येथे गेली होती. यावेळी नव्या वाडेकरने थेट पोलीसांवर फायरिंग(Fire On Pune Police) केली. पोलीसांवर त्यांने अंधाधुंद 3 राऊंड फायर केल्याचे समजते. यावेळी बचावासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी गोळीबार केला. Pune Crime News

जनता वसाहतीत गँगवॉर, वाडकर टोळीची दहशत पर्वतीमध्ये निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या अशा दोन टोळ्या आहेत. वर्चस्ववादातून दोन्ही टोळ्यांमध्ये अनेकदा खटके उडाले. चॉकलेट सुन्याच्या टोळीने 2018 मध्ये निलेश वाडकर याचा पर्वती पायथा येथे खुन केला. चॉकलेट सुन्यासह 22 जणांना अटक करण्यात आली. चॉकलेट सुन्या आणि साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्यात आली. निलेश वाडकरचा मुलगा नवनाथ हा अल्पवयीन होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची शप्थ त्याने घेतली. वाडकर टोळीने चॉकलेट सुन्याच्या भावाचा खून केला. नवनाथने अल्पवयीन असतानाच दोन जणांच्या खूनाचा प्रयत्न केला. नवनाथवर अल्पवयीन असताना पासून आठ गुन्हे दाखल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0