Pune Gutkha Mafia | पुण्यात गुटखा माफिया तेजीत : पोलीस आयुक्तांचे धोरण ठरतंय कुचकामी !
पुण्यात गुटखा किंग कोण ?
- पुण्यात गुटखा किंग कोण ?
पुणे, दि. १९ मार्च, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Gutkha Mafia | Gutkha mafia booming in Pune: Police commissioner’s policy is turning out to be a mistake!
पुणे शहर व परिसरातील कुख्यात गँगस्टर, गुंडांसह अवैध धंदेवाल्यांची परेड घेणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे धोरण आता कुचकामी ठरत आहे. पुणे शहर पोलीस दलात आयुक्त म्हणून रुजू होताच अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar यांनी गुन्हेगारी व अवैध धंदे बाबत कडक धोरण हाती घेत कारवाईचा बडगा लावला होता. परंतु काही दिवसातच पुण्यात गुटखा माफियांच्या तेजीने आयुक्तांचे धोरण कुचकामी असल्याचे दाखवून दिले आहे. Pune Gutkha Mafia
पुणे शहरात विशेषकरून उपनगरांमध्ये प्रतिबंधित गुटखा सरार्स उपलब्ध होत असलेने गुटखा माफियांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अवैध धंदेवाल्यांनी चोरी चोरी चुपके चूपके, ठिकाणा आलटून पालटून उद्योग सुरूच ठेवल्याचं समोर येतंय. गेल्या दोन वर्षात एकही मोठी गुटखा विरोधी कारवाई न झाल्याने गुटखा किंग निर्धास्त झाले आहेत. Pune Gutkha Mafia
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमडी MD (मेफेड्रोन) Maphedrrone ड्रग्सचे रॅकेट उद्धवस्त करत हजारो कोटी रुपयांचा एमडी पकडला. ड्रग्सची पाळेमुळे खोदून काढत दिल्लीपर्यंत छापेमारी केली. ड्रग्सबाबत संवेदनशील असणारे आयुक्त गुटख्याबाबत गप्प का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुण्यात हडपसर, चंदननगर, कोंढवा, लोणीकंद, लोणीकाळभोर, भारती विद्यापीठ, सिंहगडरोड, विश्रांतवाडी परिसरात गुटखा माफिया मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर गुटखा माफियांनी आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे.
पुण्यात गुटखा किंग कोण ?
पुण्यात गल्ली बोळात टपरीवर गुटखा, पानमसाला सर्रासपणे विक्री होत आहे. यात प्रामुख्याने हडपसर, चंदननगर भागातील गुटखा किंग मोठ्या आघाडीवर आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर गुटखा किंग आव्हान निर्माण करीत आहेत.
https://www.instagram.com/mubarakj15/p/C4sLVwlJHfc
Daund Breaking News : आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी ; बाजार मैदानात भरविण्याची मागणी
The title of the document is Pune Gutkha Mafia | पुण्यात गुटखा माफिया तेजीत : पोलीस आयुक्तांचे धोरण ठरतंय कुचकामी ! The Pune police commissioner has taken a strong stance against the gutkha mafia, despite being more focused on drug-related issues. The gutkha mafia operates extensively in areas such as Hadapsar, Chandannagar, Kondhwa, Lonikand, Lonikalbhor, Chatushrungi, Bharati Vidyapeeth, Singhad Road, and Vishrantwadi. Pune Police Commissioner Amitesh Kumar has been challenged by the gutkha mafia. Who is the Gutkha King in Pune? is the question arising from this situation, with major presence in Hadapsar and Chandannagar. Commissioner Amitesh Kumar is facing the challenge from the Gutkha King.