मुंबई

MNS Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे एनडीएमध्ये जाण्याच्या तयारीत आहे एकनाथ शिंदे गट तणावात

•शिंदे गटाचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर, राज ठाकरे आणि भाजप यांच्या जवळकीमुळे खासदारांमध्ये चिंतेचे वातावरण

मुंबई ‌:- अमित शहा यांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत भेटीला ‌पोहोचले आहेत. दुसरीकडे, महायुतीमधील लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे गटाचे सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत. आतापर्यंत खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमाने हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहेत. Raj Thackeray

राज ठाकरे एनडीए/महायुतीत सामील होण्याची शक्यता पाहता, अनेक खासदारांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. दुसरीकडे, जागावाटपाच्या दिरंगाईमुळे अनेक खासदार नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांना 13 खासदारांचा पाठिंबा आहे. राज ठाकरे यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा सध्या उधाण धरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बऱ्याच खासदारांच्या बालकिल्ल्यात राज ठाकरे आपल्या शिल्लदारांंकरिता जागा मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Raj Thackeray

महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत
4 जून 2024 रोजी निकाल जाहीर होतील. टप्पा 1: एप्रिल 19, 2024 टप्पा 2: 26 एप्रिल 2024 टप्पा 3: 7 मे 2024 टप्पा 4: 13 मे 2024 टप्पा 5: 20 मे 2024 Raj Thackeray

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0