पुणे : मद्यधुंद तरूणाची लघुशंका, अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल

•पुण्यातील धक्कादायक प्रकार, पैसेवाल्या बापाचा माजूरडापणा तरुणाने रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून रस्त्यातच लघुशंका केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणावर शासन करण्याची मागणी
पुणे :- पुणे नगर मार्गावर असलेल्या शास्त्रीनगर चौकात सदर संतापजनक घटना घडली आहे. आलिशान बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने रस्त्यातच लघुशंका केली. यानंतर स्थानिकांनी जेव्हा या युवकाला हटकले, तेव्हा युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिग्नलवर निळ्या रंगाची एक आलिशान बीएमडब्लू गाडी उभी असल्याचे दिसते. तर गाडीच्या शेजारीच तरुण लघुशंका करत आहे. व्हिडीओ काढणाऱ्यांनी जेव्हा तरुणाला याबाबत जाब विचारला तेव्हा सदर तरुणाने अश्लिल हावभाव करून दाखवले. तसेच यावेळी गाडीत आणखी एक तरुण बसलेला दिसत आहे. ज्याच्या हातात दारूची बाटली दिसत असून तो व्हिडीओ काढा असे सांगत आहे
व्हायरल व्हिडिओ!