क्राईम न्यूज

Pune Crime News | पिस्टल, जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा तडीपार गुंड मुंढवा पोलिसांकडून जेरबंद

पुणे, दि. २ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News | Tadipar gangster carrying pistol, live cartridges arrested by Mundhwa police

गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडास मुंढवा पोलिसांनी वेळीच जेरबंद केले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गंभीर गुन्हा रोखला गेला आहे. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे वपोनि महेश बोळकोटगी व तपास पथकाने सदर धडाकेबाज कामगिरी केली आहे. Pune Crime News

गुंड तेजस कुपेंद्र पायगुडे, वय २७ रा. फ्लॅट नं. ३०१ साई निवास, जयगंगानगर शेजारी, लोणकरवस्ती केशवनगर मुंढवा पुणे. असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पेट्रोलिंग करत असताना सायं. १८.०० वा. चे सुमारास लोणकर चौक, केशवनगर भागामध्ये पेट्रोलींग चालू असतांना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली “मुंढवा पोलीस ठाणे रेकॉर्डवरील व सध्या तडिपार असणारा गुन्हेगार इसम नामे तेजस कुपेंद्र पायगुडे रा. केशवनगर मुंढवा पुणे हा लोणकर पेट्रोलपंपाचे मागे आला आहे. बातमीवरून सापळा कारवाई करून आरोपीस शिताफीने ताब्यात घेण्यात घेतले. आरोपीने पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१) (अ) (ब) चा भंग केला असल्याने त्यास पुढील कायदेशिर कारवाई करीता ताब्यात घेणे गरजेचे असल्याने सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे यांनी त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेस एक गावठी कट्टा मिळुन आला व अधिक झडती घेतली असता त्याचे पँटचे उजव्या खिशा मध्ये दोन काडतुस (राऊंड) मिळुन आले.

सदर इसम नामे तेजस कुपेंद्र पायगुडे रा. केशवनगर मुंढवा पुणे हा तडीपार असतांना देखील आदेशाचा भंग करुन गावठी कट्टा व राऊंडसह फिरत असल्याने सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद देवून मुंढवा गुन्हा रजि. नंबर ९४/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, व आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.

अटक तेजस पायगुडे विरुद्ध दखलपात्र ०४ गुन्हे, अदखलपात्र ०१ असे गुन्हे नोंद आहेत.

सदरची कामगिरी, पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, हेमंत झुरुंगे, सचिन पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0