मुंबई

Atul Save :भाजप पदाधिकारी यांची मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

Fir Filed Against Atul Save:- मंत्री अतुल सावे यांनी मारहाण केल्याचा पदाधिकाऱ्याचा आरोप

मुंबई :- राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे Atul Save यांच्यावरही भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंत्री अतुल सावे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदार संघाचे भाजप आमदार आहेत. त्यांच्यावर आसाराम डोंगर नामक भाजप पदाधिकाऱ्याने मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. आसाराम डोंगर हे मंत्री अतुल सावे यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी तू देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात राहतोस असे म्हणत मारहाण केली. केवळ मंत्री अतुल सावेच नाही तर त्यांच्या 2 स्वीय सहाय्यकांनीही आपल्याला मारहाण केली, असा आरोप डोंगर यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी सावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात शुक्रवारी विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. यामुळे समस्त राजकारण तापले असताना आता राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्यावरही भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. Fir Filed Against Atul Save

मंत्री अतुल सावे‌ विरोधातील तक्रार

मी आसाराम उत्तमराव डोंगरे औरंगाबादमध्ये राहणारा आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून, श्री देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. मी दि. 01.03.2024 रोजी कॅबीनेट मंत्री अतुल सावे Atul Save यांना कामानिमित्त भेटायला गेलो होतो. सावे यांनी मला अगोदर सांगितले होते की, तू इथे कशाला आलास, मी तुझे कुठलेच काम करणार नाही. तू देवेंद्र फडणवीस काय, श्री नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना सांगितले तरी मी तुझे काम करणार नाही व माझे लेटर फेकून दिले. मी बोलायला लागल्यावर मला दोन चापटा मारल्या. त्यांचे पीए प्रविण चव्हाण तसेच दुसरा पीए अशोक शेळके यांनी सुद्धा मला मारहाण केली.

तू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेच्या संपर्कात राहतोस. एवढा मोठा झालास का, तुझी औकात काय रे, भिकार** झ**, अशा अनेक प्रकारे आई-माईवर शिवीगाळ केली. मला ऑफिसमधून धक्के मारत हाकलून दिले. सावे यांनी या अगोदर सुद्धा मला चार वेळा शिवीगाळ तसेच अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. त्यामुळे सावे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, ही नम्र विनंती. Fir Filed Against Atul Save

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0