क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News | सकाळनगर, बाणेर रोड येथे घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक : २० लाखांचे दागिने जप्त

  • वपोनि अजय कुलकर्णी यांच्या नेत्तृत्वाखाली तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी | Pune Crime News

पुणे, दि. २९ मार्च, मुबारक जिनेरी, (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News | Sakalnagar, Baner Road house burglars arrested: Jewels worth 20 lakhs seized

पुण्यातील हाय प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या बाणेर रोड, सकाळनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना चतुःशृंगी पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त मगर DCP Magar यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अजय कुलकर्णी Sr.Pi. Ajay Kulkarni व तपास पथकाने कारवाई करत २० लाखांच्या दागिन्यांसह आरोपींना जेरबंद केले आहे. Pune Crime News

याप्रकरणी आरोपी नामे १. मोहमद रईस अब्दुल आहद शेख, वय ३७ वर्षे, रा. डी/२, सोसायटी नं २५, तैयबा मस्जिद जवळ, मालवणी, मुंबई व २. मोहमद रिजवान हनीफ शेख, वय ३३ वर्षे, रा. बांद्रा प्लॉट, जोगेश्वरी पुर्व, मुंबई यांना अटक करण्यात आली आहे. Pune Crime News, Mumbai Crime News

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनाकं २३ फेब्रुवारी रोजी सकाळनगर, बाणेर रोड, पुणे या परिसरामध्ये दिवसा दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा करणारे आरोपी हे मुंबई भागात राहत असल्याची माहिती प्राप्त केली होती.

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा, पालघर येथे जावून आरोपी नामे मोहमद रईस अब्दुल आहद शेख, वय ३७ वर्षे, रा. डी/२, सोसायटी नं २५, तैयबा मस्जिद जवळ, मालवणी, मुंबई व जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथून मोहमद रिजवान हनीफ शेख, वय ३३ वर्षे, रा. बांद्रा प्लॉट, जोगेश्वरी पुर्व, मुंबई यांना अटक करण्यात आली होती.

आरोपींना न्यायालयापूढे हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून मुंबई येथे जावून एकूण २०,१४,३६४/- रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये ३० तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, गुन्हा करण्याकरिता वापरलेली कटावणी, पोपट पाना व स्क्रू ड्रायव्हर इ. पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी हे दिवसा घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. गुन्हयाचा तपास चालू असून सपोनि नरेंद्र पाटील हे पूढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार Pune Police CP Amitesh Kumar, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परी-४, पुणे शहर विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त, आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गुन्हे, युवराज नांद्रे, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक, रुपेश चाळके, तपास पथकातील पोलीस अंमलदार सुधीर माने, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, किशोर दुशिंग, मारुती केंद्रे, इरफान मोमीन, बाबा दांगडे, प्रदीप खरात, श्रीधर शिर्के, विशाल शिर्के, संदिप दुर्गे व बाळासाहेब भांगले यांनी केली आहे.

Terrorist Attack Mock Drill Pune | मुंढव्यात कोपा मॉल येथे दहशतवाद विरोधी मोक ड्रिल : नागरिकांची तारांबळ !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0