क्राईम न्यूजपुणे

Terrorist Attack Mock Drill Pune | मुंढव्यात कोपा मॉल येथे दहशतवाद विरोधी मोक ड्रिल : नागरिकांची तारांबळ !

  • Terrorist Attack Mock Drill Pune | मुंढवा पोलीस आणि पुणे पोलिसांच्या क्युक रिस्पॉन्स टीम QRT कडून मोक ड्रिलचे प्रात्यक्षिक

पुणे, दि. २९ मार्च, मुबारक जिनेरी, (महाराष्ट्र मिरर) Terrorist Attack Mock Drill Pune | Anti-Terrorism Mock Drill at Kopa Mall in Mundhwa : Citizens protest

Terrorist Attack Mock Drill Pune | शुक्रवारचा सामान्य दिवस, नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाजत व्यस्त असणारे पुणेकर अशातच मुंढव्यातील कोपा मॉल Kopa Mall, Mundhwa येथे दहशतवादी घुसल्याचे समजताच नागरिकांची उडालेली तारांबळ आणि मुंढवा पोलीस आणि पुणे पोलिसांच्या क्युक रिस्पॉन्स टीम कडून परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेली धाडसी कारवाई अशा घटनांनी उजडलेला दिवस नागरिकांना पुणे पोलिसांची सतर्कता दाखवून गेला.

स्थानिक मुंढवा पोलीस व पुणे पोलिसांच्या क्युक रिस्पॉन्स टीम कडून दहशतवाद विरोधी मोक ड्रिलचे कोपा मॉल या ठिकाणी आज दि. २९ रोजी सकाळी ११.३० ते १२.३० प्रात्यक्षिक घेण्यात आले.

शहरात आतंकवादी घटना घडण्यास पुणे पोलीस सक्षमपणे परिस्थिती हाताळण्यासाठी तयार असल्याचे या मॉक ड्रिल मधून नागरिकांनी पहिले. पुणे पोलिसांचे प्रात्यक्षिक बघून पुणेकर नागरिकांचा थरकाप उडाला होता. पुणे पोलिसांचे धाडस, युद्ध कौशल्य, परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात येणाऱ्या हालचाली नागरिक पहाताच राहिले.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar, सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ -५ पोलीस उपायुक्त आर. राजा. यांनी मुंढवा येथे गजबलेल्या कोपा मॉल या ठिकाणी मुंढवा पोलिसांना मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या. यावेळी मुंढवा पोलीस ठाण्याचे वपोनि महेश बोळकोटगी व त्यांच्या पथकाकडून क्युक रिस्पॉन्स टीम समवेत सदर थरकाप उडवणारा मॉक ड्रिल घेण्यात आला.

Pune Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची कारवाई ; ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना अटक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0