क्राईम न्यूज

Pune Crime News : मुंढवा पोलीस ठाणे पोलीसांची कौतुकास्पद धडाकेबाज कामगिरी… सोनसाखळी चोरास अटक

पुणे :- जबरी चोरी मधील आरोपींना नाशिक व जळगाव येथून तालुक्यातील आहे. मुंढवा पोलिसांचे धडाकेबाज कामगिरी केली असून आरोपींना अटक केली आहे. दिनांक 09 एप्रिल 2024 रोजी बी.टी. कवडे रोड, घोरपडीगाव, पुणे Pune Crime News येथे महिला नावे माधवी श्रीनिवास गंपा (38 वर्षे) धंदा- व्यवसाय रा. सर्वे नंब 74 प्रकाश कॉम्पलेक्स घर नंबर 24 पहिला मजला, बीटी कवडे रोड, पुणे ह्या पायी चालत जात असतांना दुचाकीवरुन जात असणाऱ्या दोन अनोळखी इसमांनी सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून चोरुन नेल्याने महिलेने मुंढवा पोलीस ठाणे येथे दिले तक्रारीवरुन अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा भादंवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांचे अनोळखी इसमांने अंदाजे 2 लाख 45 हजार रु. किमतीचे सोन्याचे चैन असलेले मंगळसूत्र, लक्ष्मीचे कॉईन असे हिसकावून नेल्याने चोरीस गेले आहे.

प्रस्तुत घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी घटनस्थळी भेट देवून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन सदर परिसरातील व आजू-बाजूच्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेणे करीता तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांच्या दोन टिम तयार करुन हद्दीत परहद्दीत रवाना केले. Pune Crime News तपास पथकाचे अधिकारी सह, पोलीस निरीक्षक, समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक, अनिल बिनवडे व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषण करुन आरोपीतांची इतंभूत माहिती प्राप्त करुन दाखल गुन्हयातील आरोपी नाशिक व जळगाव जिल्हा येथून अशा वेगवेगळया ठिकाणारुन दोन आरोपींना ताब्यात घेवून दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयात चोरीस गेलेला काही किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे हे करीत आहेत.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे,पोलीस उप- आयुक्त, आर राजा, परिमंडळ 5 पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम, सहा. पोलीस निरीक्षक, समीर करपे, पोलीस उप-निरीक्षक, अनिल बिनवडे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश (नाना) भांदुर्ग, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, हेमंत पेरणे, सचिन पाटील, स्वप्निल रासकर, किरण बनसोडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0