Pune Crime News : कोंढवा पोलिसांची कारवाई ; 12 तासाच्या आत आरोपी जेरबंद, वीस वर्षाच्या तरुणाने 44 वर्षाच्या व्यक्तीचा केला खून

Pune Crime News Kondhwa Police Arrested Criminal : कोंढवा पोलीस आणि आरोपीला अटक करून मृतदेहाची ओळख पटवण्यास यश आले आहे
पुणे :- (18 मे) संत गाडगे महाराज शाळेसमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची कोंढवा पोलिसांना माहिती मिळाली होती. सकाळी साडेसात वाजले च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पाहणी करून अज्ञात व्यक्तीच्या अज्ञात कारणावरून मृत्यू झाल्याचे कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) नोंद करण्यात आली होती. पोलिस रंजीत रंगनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) गुन्हेगाराचा शोध घेत काही तासातच आरोपीला जेरबंद केले आहे. या घटनेमध्ये वीस वर्षाच्या आरोपीने 44 वर्षाच्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवेठार मारले आहे. Pune Crime News
संत गाडगे महाराज शाळेच्या परिसरात घडलेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराचे माहिती गोळा केली. ए. राजा, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-5. पुणे अमोल झेंडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर.गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कोंढवा पोस्टे पुणे शहर.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे . कोंढवा शहर. सचिन थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंढवा पोस्टे पुणे शहर,सुकेशीनी जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंढवा पोस्टे पुणे शहर.लेखाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंढवा पोस्टे पुणे शहर. बालाजी डिगोळे, पोलीस उपनिरीक्षक कोंढवा पोस्टे पुणे शहर. यांनी घटनास्थळी भेट देत कोणावर पोलिसांना संबंधित आरोपीला शोधण्याचे निर्देश दिले. Pune Crime News
पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मृत व्यक्तीचे ओळख पटले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये आरोपी यश श्याम अस्वरे (20 वर्ष), याने शकील गुलाब शेख (44 वर्ष) यांना धारदार शस्त्राने वार करत जिवे ठार मारल्याचे कबूल केले आहे. Pune Crime News