महाराष्ट्र
Trending

Rohit Pawar : परळीत आता यापुढे लोकशाही नाहीतर गुंडाराज…. आमदार रोहित पवार

Rohit Pawar Tweet On Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदानसंघात बोगस मतदान रोहित पवार यांचा आरोप

बीड :- राज्यात चौथा टप्प्यामध्ये (Maharashtra Lok Sabha Phase 4) म्हणजेच 13 मे रोजी बीडमध्ये मतदान (Beed Voting) झाले होते. बीड जिल्ह्यात बोगस मतदान (Beed Fake Voting) झाल्याचा थेट आरोप आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar Tweet) आपल्या सोशल मीडियावर ट्विट करत निवडणूक आयोगाला या संदर्भात उत्तर देण्याची मागणी केली आहे. बीडमध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्याशी लढत होती. राष्ट्रवादी फुटी नंतर अजित पवार गटामध्ये सामील झालेले बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे महायुतीच्या उमेदवार असल्याने महायुद्ध सामील असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट धनंजय मुंडे संपूर्ण ताकतीने या लोकसभेच्या निवडणुकीत बहीण पंकजा मुंडे करिता प्रचार करत होते.

मतदानाच्या दिवशी बीडच्या परळी भागात असलेल्या मतदान केंद्रात बोगस मतदान होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी ट्विट करत व्हिडिओ टाकून निवडणूक आयोगाला उत्तर मागितले आहे. Rohit Pawar Question Election Commission On Fake Vote Scam During Beed Lok Sabha Election

रोहित पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की…,


बीड जिल्ह्यात विशेषतः परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? Election Commission of India ने उत्तर द्यावे…

20 मे ला राज्यात पाचवा टप्प्याचे मतदान होणार असून आत्तापर्यंत चार टप्प्यात मतदान झाले आहे शेवटच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर 4 जून रोजी 48 जागांचे निकाल येणार आहे या निकालानंतर महाराष्ट्र राज्यात महायुती कामा विकासासाठी कोणाचं वर्चस्व निर्माण होणार आहे हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0