क्राईम न्यूजमुंबई

Pune Crime News : दोन पिस्तूल आणि चार काडतुसांसह एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी ; नवीन कॅनोल रोड आनंदवन हेरीटेज बिल्डींग जवळ हिंगणे खुर्द पुणे परिसरातून तीन गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग, आरोपींकडे दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे

पुणे :- सिंहगड पोलिसांच्या Sinhagad Police पथकाने नवीन कॅनोल रोड आनंदवन हेरीटेज बिल्डींग जवळ हिंगणे खुर्द पुणे तीन जणांना बेकायदेशीर रित्या बंदूक Man Arrested With Gun बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. या तीन आरोपींमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Pune Police पोलिसांनी आरोपीकडून दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केले आहे. अटक केलेले आरोपी हे सराईत आरोपी असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.राज रविंद्र जागडे (22 वय,रा. आझाद मित्र मंडळाजवळ चरवडवस्ती वडगाव बुद्रुक पुणे) अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांचे नाव असून त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. Pune Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस अंमलदार स्वप्निल मगर व पोलीस अंमलदार विनायक मोहीते यांच्या खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, धायरी , न-हे भागात एक व्यक्ती अवैध रित्या गावठी पिस्टल जवळ बाळगुन भागात फिरत आहेत. अशी खात्रीशिर बातमी मिळाली असता बातमी त्यास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री करुन पुढील योग्य ती कादेशिर कार्यवाही करण्यास सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर, पोलीस हवालदार तारू, पोलीस शिपाई चव्हाण, मोहिते, शेडगे,पाटील,मगर, दोन पंच असे खाजगी वाहनामधुन सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत फिरत वडगाव पुलाखाली पुणे येथे दुपारच्या सुमारास आले असता, पोलीस अंमलदार स्वप्निल मगर, विनायक मोहीते व शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमी दारामार्फत पुन्हा बातमी मिळाली की, दोन ते तिन व्यक्ती त्यामधील एकाने अंगात काळ्या रंगाचा शर्ट व जिन्स पॅन्ट घातली आहे. त्यांच्याकडे गावठी पिस्टल असुन ते नवीन कॅनोल रोड आनंदवन हेरीटेज बिल्डींग जवळ हिंगणे खुर्द पुणे येथे उभे आहे. Pune Latest Crime News

अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जावुन सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस स्टाप, दोन पंच असे खाजगी गाडीने वडगाव ब्रिज येथे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणीथांबुन बातमी प्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णना प्रमाणे तीन व्यक्ती हे रोडच्याकडेला एकमेकांसोबत बाचाबाची करत असल्याचे दिसुन आले पोलिसांना बघून तिन्ही आरोपी पळून जाताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली आहे.आरोपी राज जागडे याचे जवळ 40 हजार किंमतीचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आले तसेच दोन अल्पवयीन मुलांकडे सुद्धा 40 हजार रुपये किंमतीची एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुस जवळ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत. Pune Latest Crime News

पोलीस पथक

अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, Pune CP Amitesh Kumar रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर,प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -3, पुणे शहर अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर राघवेद्रसिंह क्षीरसागर , वरीष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, पंकज देशमुख, अमोल पाटील, विनायक मोहीते, स्वप्निल मगर, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, यांचे पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0