Panvel News : महापालिकेच्यावतीने प्रदूषण विरहित व फटाके मुक्त दिवाळी विषयावर परिसंवाद
पनवेल : आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका आयोजित माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ‘ग्रीन फेस्टिवल’ या विषयांतर्गत”प्रदूषण मुक्त दिवाळी ” ह्या विषयावर आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी पिल्लई काॅलेज ऑफ आर्ट्स ,काॅमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पिल्लई काॅलेज ऑफ आर्ट्स ,काॅमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन वाडेर, बी. काॅम विभागाच्या समन्वयक प्राध्यापक डॉ. किरण देशमुख तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत उपायुक्त डॉ. वैभव विधाते ह्यांनी दिलेल्या सूचनेनूसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रदूषणाचे परिणाम, पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच फटाकेमुक्त दिवाळी, ग्रीन फेस्टिवल आणि प्रदूषण मुक्त दिवाळी चे बॅनर बनवून जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी माझी वसुंधराची प्रतिज्ञा घेण्यात आली.