आर्थिक

PM Modi Threat Message : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

PM Modi Threat Message Through The Post : नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, हातात तलवार घेऊन व्हिडीओ केला पोस्ट,आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सर्व पक्षांनी आपली पक्ष बांधणी आणि उमेदवारांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे

ANI :- आगामी लोकसभा निवडणुका Lok Sabha Election 2024 कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. PM Modi Threat Message

कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिलीय. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिलीय. हा व्हिडीओ समाजमाध्यावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. PM Modi Threat Message

वेगवेगळ्या कलमांअतर्गत गुन्हा दाखल

पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 505 (१) (ब), 25 (1) (ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0