मुंबई
Trending

Congress News : महाराष्ट्र काँग्रेस कोअर‌ कमिटीची बैठक

Maharashtra Congress Meeting : मुंबईच्या टिळक भवन येथे काँग्रेस कोर कमिटीची बैठक, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस कोअर कमिटीची बैठक मुंबईच्या टिळक भवन येथे पार पडली आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि आमदार आणि सदस्य उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाचे समजले जात आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्षाने यंदाच्या निवडणुकीत कमाल जागा मिळवून जास्तीत जास्त विजय मिळवण्याच्या प्रयत्न राहील. परंतु काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेसचे साथ सोडून इतर पक्षात प्रवेश केला त्यामुळे यंदाची निवडणूक काँग्रेसकरिता महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे काँग्रेसचे मुख्य नेते राहुल गांधी सध्या देशभरात भारत न्याय जोडो यात्रा करत आहे काही दिवसात हे यात्रा महाराष्ट्र येथेही दाखल होणार असून या यात्रेनंतर काँग्रेस आपली उमेदवारी यादी जाहीर करू शकते. तसेच महाविकास आघाडी बरोबर काँग्रेसला 15 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Congress Meeting

काँग्रेस कोअर कमिटीची बैठक Maharashtra Congress Meeting आज मुंबई येथील टिळक भवनात पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार चंद्रकांत हांडोरे, कार्याध्यक्ष नसीम खान, आ.यशोमती ठाकूर, आ. विश्वजीत कदम, आ.सतेज पाटील, आ.प्रणिती शिंदे, आ. अमित जनक, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आदी काँग्रेस नेते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0