Panvel Police News : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसह होमगार्ड पथकाचा करण्यात आला विशेष सत्कार
पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोेनि नितीन ठाकरे यांनी एक आदर्शवत असा उपक्रम पोलीस ठाण्याच्या आवारात राबविला. तो म्हणजे 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसह होमगार्ड पथकाचा विशेष सत्कार केला.
18 वी लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने मतदान प्रक्रिया करिता पनवेल शहर पोलीस ठाणे चा बंदोबस्त नेमण्यात आला होता परंतु मनुष्यबळ कमी असल्याकारणाने बाहेरून नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील 87 पोलिस अंमलदार व कर्नाटक एसआरपीचे एक सेक्शन तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, येथील महिला व पुरुष 140 होमगार्ड बंदोबस्ताकरिता पुरविण्यात आले होते. सदर होमगार्ड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा उचित सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केला.
यावर प्रतिक्रिया देताना होमगार्ड इन्चार्ज यांनी सांगितले की माझ्या बत्तीस वर्षे सेवेमध्ये असा कुणीही सत्कार केला नव्हता. त्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे नितीन ठाकरे साहेबांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. यांच्याबरोबरच पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व गोपनिय विभाग यांचा सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.