मुंबई
Panvel News : समर्थ लोकतंत्र हिंदी साप्ताहिकाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याहस्ते प्रकाशन

पनवेल जितिन शेट्टी : समर्थ लोकतंत्र ची मांडणी उत्तम झाली आहे.सर्वांना भावेल असे हे वृत्तपत्र वाटत आहे. हिंदी भाषेत साप्ताहिक नवी मुंबई मधून होतंय हे विशेष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
समर्थ लोकतंत्र या नवी मुंबई मधून प्रकाशित साप्ताहिकाचे प्रकाशन आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात करण्यात आले.पहिल्याच अंकाच्या मुखपृष्टावर त्यांनी नवी मुंबईत “द रेस” लेडीज बार वर केलेल्या कारवाईचे प्रकर्षाने वृत्त प्रकाशित केले आहे. यावेळी संपादक देवेश मिश्रा, निवासी संपादक किरण बाथम,पत्रकार सुरेंद्र सरोज व त्यांचे सहकारी अनिल कांगडा उपस्थित होते.


