मुंबईक्राईम न्यूज
Trending

Online Telegram Scam : ऑनलाइन फसवणूक ; Telegram Channel ऑनलाइन रेटिंग टास्क, पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली लाखोचा गंडा

Online Telegram Scam News Virar Cyber Police Arrested Criminal : सायबर पोलीस ठाण्यास यश ; Telegram Channel वरील Part time job मध्ये ऑनलाईन रेटिंग नेण्याच्या सांगून तक्रारदाराचे फसवणूक केलेले रकमेपैकी एक लाख 59 हजार 242 रुपये तक्रारदाराचे परत करण्यास पोलिसांना यश

विरार :- Telegram Channel वर ऑनलाईन रेटिंग देण्याचे काम (Telegram Online Rating Job Scam) असल्याचे सांगून या पार्ट टाईप जॉब मध्ये अधिकचे पैसे मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना मिरा भाईंदर वसई विरार पोलीस (Virar Police) आयुक्तालयाच्या हद्दीतील विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे तक्रार समोर आली आहे. तक्रारदार नावे झा यांनी टेलीग्राम ॲपवर पार्ट टाईम जॉबची जाहिरात पाहिली.(Telegram Part Time Job) जाहिराती मध्ये ऑनलाईन प्रॉपर्टीना रेटिंग दिल्यावर काही रक्कम मिळणार असल्यबाबत केले होते. रेटिंग देण्याकरीता टास्क (Online Rating Task) विकत घेण्याचाचत नमूद करण्यात आल्याने तक्रारदार यांनी काही टास्क विकत घेतले. परंतु त्यांना कोणताही परतावा न देता आधिक फसवणुक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाणे (Cyber Police Station) येथे तक्रारी अर्ज प्राप्त करण्यात आला होता. Virar Cyber Crime News

तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज प्राप्त होताच झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती घेवून संबंधीत बैंकेसोबत तात्काळ पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांची रक्कम गोठविण्यात आली. विरार पोलीस भादंविसंकलम 420 सह आयटी ॲक्ट 66 (क), 66 (ड) प्रमाणे दाखल करण्यात आलेला असून प्राप्त तक्रारी अर्ज तसेच गुन्हयांचे तपासाचे अनुषंगाने सायबर पोलीस ठाणे यांचेकडून तपास करण्यात आला. तक्रारी अर्जाचे तसेच गुन्हयाचे अनुषंगाने संबंधीत बैंकेसोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांची रक्कम वेळीच संशयीत बैंक खात्यांमध्ये गोठविण्यात आली आहे.त्यानंतर तक्रारदार यांची रक्कम त्यांचे मुळ खात्यात जमा होणेकरीता वेळोवेळी संबंधीत बैंकेसोचत पाठपुरावा आल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 1 लाख 51 हजार 242 रु त्यांचे मुळ खात्यात परत मिळून दिल्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Virar Cyber Crime News

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार पल्लवी निकम, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, सायन शेवाळे, शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे. Virar Cyber Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0