Panvel News : युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच घेणार !
राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची घोषणा
पनवेल : संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही देश पातळीवर समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच होणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिली. युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन झाल्यापासून ग्रामीण भागातील व शहरातील पत्रकारांचा पाया उभा करणे हे एकच ध्येय मनात ठेवून संघ काम करीत आहे. पत्रकारांवर होणारे अन्याय, अत्याचार, वृत्त संकलन करताना अनेक अडचणींना पत्रकाराना सामोरे जावे लागते. पत्रकारांच्या समस्या सोडविणे व वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी लढा देणे यासाठी संघ प्रयत्नशील आहे. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच घेऊ, या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील व देशातील पत्रकारांनी सहभागी व्हावे, असेही आवाहनही त्यांनी केले. अधिवेशनामध्ये निर्भीड पत्रकारांचा सन्मान करून पुरस्कार जाहीर करू असे देखील सांगितले.