Panvel News : वीज ग्राहकांचा संभ्रम दुर होईपर्यंत स्मार्ट प्रीपेर मीटर बसवण्यात स्थगिती द्यावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने जनआंदोलन
सुनिल सावर्डेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस क.जा.क
पनवेल (जितीन शेट्टी) : एम. एस. सी. बी चा माध्यमातून ग्राहकांचे जुने मीटर काढून त्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने घेतले आहे मात्र या प्रीपेड मीटर योजनेविषयी जनजागृती केलेली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झालेला आहे तसेच वीज मीटर धारकांचा जोपर्यंत संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत सदर कामास स्थगिती देण्यात यावी कारण वीज कायदा कलम 2003 मधील मीटर निवडीचे अधिकार ग्राहकांना आहेत तसेच या योजनेने घरगुती, शेतकरी व व्यापारीवर्ग यांना काडीचाही लाभ होणार नाही असे असताना ग्राहकांवर जबरदस्ती करून स्मार्ट प्रीपेर मीटर बसू नये अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनिल सावर्डेकर उपाध्यक्ष प्रदेश यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
यावेळी नियाखत शहा अध्यक्ष चिपळूण ता काँग्रेस सुर्यकांत चिपळूणकर तालुकाध्यक्ष चिपळूण अ.जा.कमिटी निर्मला जाधव, तालुकाध्यक्ष महिला, सफाताई गोठे, माझी नगरसेवक चंद्रकांत पेवेकर तालुकाध्यक्ष खेड अ.जा.कमिटी सुर्यकांत आंब्रे तुळशीराम पवार जिल्हायक्ष सेवादल काँग्रेस, अल्ताफ काद्री दिपक निवाते सर्व पदाधिकारी उपस्थित होते..