Panvel Suicide News : पनवेलजवळील जावळे गावात एकाच कुटुंबातील 5 जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू

Panvel Suicide Latest News : चहातून विषारी द्रव्य प्राशन केल्याची शक्यता; मूळचे नेपाळी कुटुंब दोन दिवसांपासून होते घरात बंद
पनवेल :- पनवेल तालुक्यातील Panvel Jawale Village जावळे गावामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य चौघांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Panvel Suicide News
नेमके काय घडले?
जावळे गावात भाड्याच्या घरात राहणारे मूळचे नेपाळी असलेले हे कुटुंब गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घरातून बाहेर आले नव्हते आणि त्यांच्या घराचा दरवाजाही उघडला नव्हता. यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली.
सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर कुटुंबातील पाचही सदस्य बेशुद्ध अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासानुसार, या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
एकाचा मृत्यू; चौघांवर उपचार
बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या या सर्वांना तातडीने पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी संतोष बिरा लूहार (वय 22) या तरुणाला मृत घोषित केले.
इतर बेशुद्ध व्यक्तींमध्ये रमेश बिरा लोहार (वय 23), त्यांची पत्नी बसंती, आणि त्यांची दोन लहान मुले, 5 वर्षांचा आयुष व 2 वर्षांचा आर्यन, यांचा समावेश आहे. या चौघांना पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.


