क्राईम न्यूजपुणे

Anti Corruption Bureau News : राजगुरुनगर खेड तहसील कार्यालयातील लाचखोर कारकुनाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले..

Pune Anti Corruption Bureau News : सातबारावर जमिनीची नोंद करण्यासाठी अव्वल कारकून याला 20 हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे

पुणे :- राजगुरुनगर खेड तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध Anti Corruption Bureau विभागाने कारवाई करत अव्वल कारकूनाला लाच स्वीकारताना Bribe रंगेहाथ पकडले आहे. जमिनीची नोंद सातबारावर होण्याकरिता आदेशाला मंजुरी मिळवून देण्याबाबत 50 हजार रुपयांची लाच 50 Thousand Bribe मागितली होती.

A bribe-taking clerk in the Rajgurunagar Khed Tehsil office was caught red-handed while accepting bribes.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांननी कुरुळे या गावी एक तुकडा बंदीची जमीन खरेदी केली आहे. त्या जमीनीची नोंद सातबारा उत्ता-यावर होण्याकरीता व त्याप्रमाणे नोंदणीचा आदेश मिळण्यासाठी तक्रारदार यांनी राजगुरुनगर खेड तहसिल कार्यालयास रितसर अर्ज केला होता.तक्रारदार यांनी त्याकरीता असणारी शासकीय रक्कम चलनाने भरलेली होती. अव्वल कारकून रमेश वाल्मिकी (51 वर्ष, पद अव्वल कारकुन, राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालय, ता. खेड, जि. पुणे. (वर्ग-3) यांनी सदरचा आदेश मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांचेच्या रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये निश्चित झाले होते.यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागानकडे तक्रार केली होती. Pune Anti Corruption Bureau News

तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, कारकून रमेश वाल्मिकी यांनी तक्रारदार तडजोडीअंती 20 हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले त्यानंतर रमेश वाल्मिकी यानं तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेतल्याचे पंचासमक्ष स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध सखेड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 से कलम 7, 7 अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत. कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे Pune Anti Corruption Bureau News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0