पुणे

Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली; बारामतीहून तातडीने पुण्याला रवाना, रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू

•अजित पवारांच्या अकाली निधनाचा धक्का आणि धावपळीमुळे प्रकृतीवर परिणाम

पुणे/बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती आज अचानक खालावल्याने त्यांना बारामतीहून तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांतील कौटुंबिक दुःख आणि शारीरिक थकव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे समजते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे.

मानसिक आणि शारीरिक ताण कारणीभूत?

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले. या धक्क्यातून शरद पवार अजूनही सावरलेले नाहीत. आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या निधनानंतरचा ‘तेरावा’ विधी पार पडत आहे. मात्र, सकाळी नऊच्या सुमारास शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते आजच्या विधीलाही उपस्थित राहू शकले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0