क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Malad Chain Snatching Case : मालाड चैन स्नॅचिंगचा गुन्हा 12 तासांत उघड; सराईत गुन्हेगाराला अटक, 100% मुद्देमाल हस्तगत

Mumbai Dindoshi Police Arrested Chain Snacher : दिंडोशी पोलिसांची धडक कामगिरी; 40 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर कारवाई

मुंबई (मालाड) :-;मुंबईतील मालाड पूर्व परिसरात एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेण्याचा गुन्हा दिंडोशी पोलिसांनी Mumbai Dindoshi Police Station केवळ 12 तासांच्या आत उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात सामील असलेल्या अट्टल आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी 100% चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Mumbai Latest Crime News

दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास, 81 वर्षीय महिला फिर्यादी मानतुबु ने रायशिभाई रातरा या मालाड पूर्व येथील पेठे नगरजवळून देवदर्शनासाठी जात असताना, एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली होती. गुन्हा दाखल होताच, सहाय्यक पोलीस आयुक्त (दिंडोशी विभाग) आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ चार पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. Mumbai Chain Snatching Case

पोलिसांनी तांत्रिक आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून संजय श्रीपत सुकम (वय 35, रा. मालाड पूर्व) या आरोपीला त्याच दिवशी डायमंड मार्केट, मालाड पूर्व येथून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून 13.99 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली, ज्याची अंदाजित किंमत 1 लाख 29 हजार 057 आहे. अटक केलेला आरोपी संजय सुकम हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना आणि पोलीस उपआयुक्त महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0