Panvel News : ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका पनवेल ग्रामपंचायत वर कायदेशीर योग्य ती कारवाई करावी मुख्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष;अर्धवट कारवाई.!भ्रष्टाचाराला पाठिंबा ?
दलित पॅंथर संघटना पनवेल तालुका अध्यक्ष यश कुमार पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी मागणी..!
पनवेल – ग्रुप ग्रामपंचायत पोसरी तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे माहितीचा अधिकार मागवली असता पंचायत समिती पनवेल गट विकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी चौकशी अहवाल मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) नुसार कारवाई करणे बाबत सांगितले असून उप मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करण्यास विलंब करत आहे व उप मुख्य अधिकारी याबाबत काहीच लक्ष न देत असल्याकारणामुळे व कुठेतरी दिरंगाई होताना दिसून येत आहे याबाबत कारवाईच्या आदेश दिल्या असून अद्यापही कारवाई झाली नाही आहे दलित पँथर संघटनेचे पनवेल तालुकाध्यक्ष यश कुमार पाटील यांचे वारंवार निवेदन देऊन सुद्धा अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत व भ्रष्टाचाराला कुठे तरी वाचा फोडताना दिसून येत आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड भ्रष्टाचार झालेला असून कारवाई करत नाही आहेत साहेबाना कॉल व मेसेज करून विचारणा केली असता आज देतो उद्या देतो असाच उडवा उडवीची उत्तर देत आहेत प्रशासनाने याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी याबाबत लेखी अवहाल सादर करावा अन्यथा दलित पँथर संघटना पनवेल यांच्या वतीने उपोषण करण्यात येईल.