मुंबई

Panvel Lalbhaug Cha Raja : पनवेलकरांना घडणार लालबागच्या राजाचे दर्शनमहात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना गौरा गणेश उत्सवाचे ३२ वे वर्ष

पनवेल : भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या व ज्याच्या दर्शनासाठी लाखो भक्तांचा सागर मुंबईत लोटतो त्या लालबागच्या राजाचे दर्शन पनवेलकरांना होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना श्री गौरा गणेश उत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये २१ सप्टेंबर २०२४ ला विराजमान होणार आहे. Panvel Lalbhaug Cha Raja संघटनेचे गौरा गणेश उत्सवाचे हे ३२ वे वर्ष असुन सामाजिक बांधिलकी जोपासून श्री गौरा गणेश उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा केला जात असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगितले आहे. पनवेल मधील महात्मा ज्योतीबा फुले हातगाडी संघटना व फळभाजी विक्रेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने गेल्या ३१ वर्षापासून गौरा गणेश उत्सव साजरा केला जात आहे. या संघटनेचे जवळपास तीन हजारापेक्षा जास्त सभासद असून यामध्ये छोटे मोठे व्यवसाय करुन आपले उदरनिर्वाह करणाऱ्यांचा सहभाग मोठया संख्येने आहे. Panvel Latest News

गौरा गणेश उत्सव साजरा करण्यामागची संकल्पना सांगताना महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यात गणेश उत्सव साजरा होत असताना गणेश भक्ताना गणरायासाठी आवश्यक असणारे साहित्य विक्री करण्यात येथील छोटे व्यावसायिक गुंतलेले असतात. त्यावेळी गणेश उत्सवाचा आनंद घेता येत नाही. सर्वच संघटनेचे सभासद गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करु शकत नाहीत. यासाठीच संघटनेने ३१ वर्षापूर्वी गौरा गणेश उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. २१ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ८ वाजता आमदार प्रशांत ठाकुर यांचा हस्ते श्री गौरा गणेशपूजन होणार असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी सांगितले. उत्सवाच्या प्रारंभी वेगवेगळ्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली जात होती. परंतु गेल्या २५ वर्षापासून लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेल मध्येच तयार करुन स्थापना केली जात आहे. लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे संतोष कांबळी व त्यांचे इतर सहकारी गेल्या पंधरा ते वीस दिवसापांसून पनवेलमध्ये गणेशमूर्ती साकारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. तसेच राजाचे धोतर सजवण्याचे काम रुपेश पवार करीत आहेत. गौरा गणेश उत्सव साजरा करीत असताना सर्व धर्मिय, जात पात , वंश भेद विसरुन एक दिलाने काम करीत असतात. याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादाचा लाभ जवळपास साठ हजारापेक्षा जास्त गणेश भक्त घेत असतात. Panvel Latest News

पनवेलमधील मार्केटच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबई , ठाणे , विरार, पालघर, नवीमुंबई, तसेच रायगड जिल्ह्यातून पाच लाखांच्यापेक्षा जास्त भाविक आपली हजेरी लावतात. लालबागच्या राजाचे दर्शन झाले नाही असे भाविक व पूर्ण केलेल्या मनोकामनाचे नवस फेडण्यासाठी भक्त पनवेलकडे धाव घेतात. महात्मा फुले हातगाडी संघटनेच्या सभासदांना मार्केटच्या राजाचे कृपाछत्र चांगलेच लाभले असून जे हातगाडीवाले रस्त्यावर व्यवसाय करुन पोट भरत होते. ते सभासद आता चारचाकी गाडीतून फिरत असल्याचे गौरा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक यांनी सांगून आमच्या सर्वावर राजाची कृपा असल्याचे भावूक होऊन सांगतात. दिड दिवसांनंतर मोठ्या दिमाखात शाही थाटात राजाचे विसर्जन २२ सप्टेंबर २०२४ ला मोठ्या भावपूर्ण वातावरणात होणार असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या गौरा गणेश मंडळाचे सचिव दिलीप अनभुले यांनी सांगितले. Panvel Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0