मुंबई
Trending

RTO News : बॉस’ची ‘दादा’ गिरी संपली

■ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्चा बोलबाला

■ कारागिरांच्या बुद्धीला मिळाली विश्रांती

गडब : परिवहन विभागाच्या नवीन नियमांमुळे Regional Transport Office वाहन खरेदीदाराला संबंधित कंपनीकडूनच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावूनच दिली जात आहे. त्यामुळे दादा, बॉस, नाना, आई, साई अशा नंबर प्लेटची क्रेझ आता संपुष्टात आली आहे. नागरिकदेखील कारवाईच्या भीतीने फॅन्सी नंबर प्लेटच्या नादी लागत नाहीत, तसेच अशा नंबरचा जुगाड करणाऱ्या कारागिरांच्या बुद्धीलाही आता विश्रांती मिळाल्याचे चित्र आहे. RTO Take Action On Fancy Number Plate

वाहन खरेदी करताना आपल्या वाहनासाठी आकर्षक नंबर असावा, असे सर्वांनाच वाटते. वाहनाला विशिष्ट नंबर मिळाल्यावर त्या नंबरवर विविध प्रकारे संशोधन करुन इंग्रजी अक्षरांना मराठी भाषेच वळण देऊन त्यापासून दादा, नाना, आई, बाबा, बॉस अशी अक्षरे तयार करुन तशी नंबर प्लेट तयार केली जायचे फॅड चांगलेच फोफावले होते. RTO Take Action On Fancy Number Plate

अशा प्रकारची अक्षरे नंबर प्लेटवर असल्याने तो नेमका कोणता नंबर आहे. हे लगेचच ओळखता येत नव्हते. तसेच अपघात घडल्यास त्या वाहनाचा कोणता नंबर होता, याची माहिती मिळणे कठीण व्हायचे. RTO Take Action On Fancy Number Plate

कायदा धाब्यावर बसवून नियम मोडणाऱ्यांना आता चांगलीच अद्दल घडवण्यात येत आहे. वाहन खेरदी करताना ते घरी घेऊन जाण्याआधीच तुमच्या वाहनांवर आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात येत आहे. त्यामुळे त्या क्रमांकासोबत कोणत्याच प्रकारे छेडछाड करता येणार नाही. त्यामुळे नजीकच्या कालावधीत अशा फॅन्सी नंबर प्लेटला एक प्रकारे लगाम घातला गेला आहे. RTO Take Action On Fancy Number Plate

या नंबरची क्रेझ संपुष्टात नवीन नियमानुसार

उपप्रादेशिक विभागाकडूनच आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळत आहेत. त्यामुळे ४१४१ (दादा), ८०५५ (बॉस), ३१७३, ७३१५ (आई), ५९१ (साई), २१५१ (राज) अशा नंबरची क्रेझ आता संपली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0