मुंबई
Avantika Mhatre : राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला जिल्हाध्यक्षपदी सौ अवंतिका म्हात्रे यांची निवड
पनवेल (जितिन शेट्टी) : राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड महिला अध्यक्ष पदी पेण तालुक्यातील गडब येथील रहिवाशी असणाऱ्या सौ अवंतिका म्हात्रे Avantika Mhatre यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पुढील कार्यकारणीची निवड करून तो अहवाल मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवण्यात येणार आहे. सौ. अवंतिका म्हात्रे यांची पत्रकारीतेतली छाप बघून त्यांची निवड झाल्या बद्दल पेण तालुका व रायगड जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरातुन शुभेच्या देण्यात आल्या. Panvel Latest News