Nilesh Rane : आमदार भास्कर जाधव यांच्या सभेनंतर निलेश राणे यांचा व्हिडिओ व्हायरल
Nilesh Rane Video On Bhaskar Jadhav : भाजपाचे नेते निलेश राणे यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
मुंबई :- राणे विरुद्ध भास्कर जाधव Rane VS Bhaskar Jadhav यांच्यातील वाद नेहमीच विकोपाला जाताना पाहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सातत्याने कोकणातील नेत्यांना शिंगावर घेण्याची काम करत आहे. त्यांनी रामदास कदम निलेश राणे नितेश राणे नारायण राणे अशा सर्व नेत्यांना शिंगावर घेण्याचे काम सातत्याने करत असतात. परंतु काही दिवसांपासून भास्कर जाधव यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक शारीरिक हल्ल्यामुळे भास्कर जाधव यांनी रविवारी (10 मार्च) त्यांच्या मतदारसंघात एक जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना सौम्य शब्दात इशारा दिला आहे. परंतु या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांनी कोणत्याही प्रकारे वैयक्तिक टीका टिप्पणी न केल्याने निलेश राणे यांनी व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणी ताज्या केल्याचे म्हटले आहे.
निलेश राणे यांचा व्हिडिओ
नीलेश राणे Nilesh Rane यावेळी या व्हिडिओत म्हणाले की,”भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले, यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे. तुम्ही रडण्याचा कार्यक्रम बंद करा आणि कामाला लागा, तुमचे सहकारी तुमच्याकडे परततील की नाही बघा. मलाही तो काळ आठवतो, जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका बोलायचो. मी देखील ते दिवस विसरलेलो नाही. तुमच्यासोबत अनेक आठवणी आहेत, त्या आम्ही आजही विसरलेलो नाही. पण तुम्ही असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी तरुण मुले जी तुमच्याकडे काका म्हणून आदराने पाहत होती, ती तुमच्यापासून लांब गेली. तुम्ही डोंगरावर जाऊन एकटे बसा आणि या सगळ्याचा विचार करा. हा विचार करताना, ‘मी कोण आहे’ ही भावना बाजूला ठेवा”,असा सल्ला नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांना दिला.मदतीसाठी सहकारी धावून येतील ही अपेक्षा ठेवू नका तसेच नीलेश राणेंनी भास्कर जाधव यांना आवाहन देखील केले आहे. “आतातरी भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या लोकांना खोट बोलून फसवू नये. हे त्यांचे खोटे बोलायचे वय नाही. हे वय नातवंडांना खेळवण्याचे आहे. नेहमी तुमच्या मदतीसाठी कोणतातरी सहकारी धावून येणार, ही अपेक्षा ठेवू नका. आताचे राजकारण तसे राहिलेले नाही. लोकांना आता खरं-खोटं समजतं. उद्धव ठाकरे हे तुम्हाला फक्त वापरुन घेणार, याची कल्पना तुम्हाला एव्हाना आली असेल. चिपळूणमधील मागच्या घटनेनंतर ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला असा सल्ला नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांना दिला.
मदतीसाठी सहकारी धावून येतील ही अपेक्षा ठेवू नका तसेच नीलेश राणेंनी भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांना आवाहन देखील केले आहे. “आतातरी भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या लोकांना खोट बोलून फसवू नये. हे त्यांचे खोटे बोलायचे वय नाही. हे वय नातवंडांना खेळवण्याचे आहे. नेहमी तुमच्या मदतीसाठी कोणतातरी सहकारी धावून येणार, ही अपेक्षा ठेवू नका. आताचे राजकारण तसे राहिलेले नाही. लोकांना आता खरं-खोटं समजतं. उद्धव ठाकरे हे तुम्हाला फक्त वापरुन घेणार, याची कल्पना तुम्हाला एव्हाना आली असेल. चिपळूणमधील मागच्या घटनेनंतर ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, असे तुम्हाला वाटले होते. पण तसे काही झाले नाही. पण तुम्ही तुमच्याच दुनियेत मश्गूल असता, त्यामधून बाहेर पडा”, असे नीलेश राणे म्हणाले.