मुंबई

Cabinet Meeting Mumbai : राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवार आणि मंगळवार दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

•तब्बल 270 शासकीय आदेश काढण्यात आले आहेत

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तब्बल 270 शासन निर्णय आदेश काढण्याचे ठरविले आहे. यामध्ये सर्व घटकांना निधी वाटपाचा कार्यक्रम होण्याची शक्यता दिसून येत आहे. सलग दोन दिवस मंत्रिमंडळ मंडळाची बैठक Cabinet Meeting Mumbai घेण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election पार्श्वभूमीवर विविध समाज घटकांना खूश करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवस बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये विविध निर्णय घेतले जातील. तसेच गेल्या दोन दिवसांत 270 शासकीय निर्णय जारी करून निधीवाटप आणि विविध निर्णय घेण्यात आले आहेत.यात निधी वाटप, महत्त्वाचे निर्णय आणि बदल्यांचा समावेश आहे. अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या कामांसाठी निधी वाटपाचे आदेश जारी केले जातील. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम या आठवडयात जाहीर केला जाईल. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णयांचा धडाका लावण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0