क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Drug Racket : नायजेरियन नागरिकांचे नालासोपारानंतर नवी मुंबई बनले अंमली पदार्थांचे केंद्र ; 25.43 लाखांचा अंमली पदार्थ जप्त

Navi Mumbai Police Arrested Nigerian With Drug : नायजेरियन व्यक्तीला रूम भाड्याने देणे रूम मालकाला पडले महागात, इस्टेट एजंट वरही कारवाई

नवी मुंबई :- नायजेरियन वस्ती म्हणून नालासोपाराची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर येते नायजेरियन Nigerian लोक राहतात परंतु हेच नायजेरियन लोकं मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तस्करीचे Drug Racket केंद्रबिंदू बनले होते. आता या नायजेरियन नागरिकांनी आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळवला आहे. नवी मुंबईतही नायजेरियन Navi Mumbai Nigerian Migrant लोकांची वस्ती वाढत असून येथे मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा अंमली पदार्थाचे तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे नवी मुंबई नशा मुक्त अभियान सुरू केले असून त्या अनुषंगाने पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अमित काळे यांनी अमली पदार्थ तस्करी करणारे खरेदी विक्री करणारे तसेच सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा बडगा उभारला आहे. Navi Mumbai Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस नाईक संजय फुलकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली होती की एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी आय.जी रेसिडेन्सी एक फाटा तळोजा नवी मुंबई येथे छापा टाकला असता पोलिसांना एक नायजेरियन व्यक्ती आढळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 21.16g एमडी आणि 106.74 ग्रॅम कोकेन असे एकूण 25 लाख 43 हजार रुपये किमती जमली पदार्थ पोलिसांना आढळून आला अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव इफियानी क्रिस्टीयान इयादा (वय 43 वर्षे रा. आय.जी रेसिडेन्सी, एकटपाडा, तळोजा, नवी मुंबई मुळ रा. नायजेरीया देश) आहे. Navi Mumbai Latest Crime News

नायजेरीन व्यक्तीला भाडयाने घर देणारे व इस्टेट एजंट यांनी परकीय नागरीक आहे हे माहित असताना देखील त्याचेकडील कोणत्याही कागदपत्राची पडताळणी न करता, सी फॉर्म न भरता, घर भाडयाने दिल्याने गुन्हयात इस्टेट एजंट गोकुळ गायकवाड ( रा. खारघर) घरमालक यांना आरोपी करण्यात आले आहेत. Navi Mumbai Latest Crime News

आरोपीला ताब्यात घेवुन त्याच्या विरुध्द तळोजा पोलीस ठाणे Taloja Police Station येथे गुन्हा एनडीपीएस अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 21 (ब), 21 (क) 25 सह परदेशी नागरीक कायदा 1946 चे कलम 14 (सी) व रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स अँक्ट 1939 चे कलम 5 अन्वये तळोजा पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा तपास तळोजा पोलीस ठाणे करत असुन आरोपीला 14 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. Navi Mumbai Latest Crime News

पोलीस पथक

भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर विजय पाटील, रमेश तायडे, गणेश पवार, पोलीस नाईक संजय फुलकर, अकुंश म्हात्रे, यांनी कारवाई केली. Navi Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0