क्राईम न्यूजठाणे
Trending

Thane Spa Sex Racket : “स्पा”मसाज सेंटर च्या नावाखाली चाललेल्या सेक्स रॅकेटचा ठाण्यात पर्दाफाश

Thane Police Busted Spa Sex Racket : ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई, “स्पा”मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायासाठी पीडित महिलेला आणले होते.पोलिसांनी छापेमारी करत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली

ठाणे :- “स्पा” मसाज सेंटरच्या Thane Spa Massage Center नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा Thane Spa Sex Racket भांडाफोड केला होता. यापूर्वी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात चालणाऱ्या स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या वेश्याव्यवसाय बाबत वेळोवेळी पोलिसांकडून कारवाई केलेली आहे. ठाण्यात पोलिसांच्या Thane Police Action एका कारवाईत स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली चालू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या काम करिता आणणारे आलेल्या सात पिडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई करत पीडित महिलेंची सुटका केली आहे. Thane Police Latest Crime News

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कोणत्याही प्रकारे अवैध धंदे चालणार नाही याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीनुसार एवलोन वेलनेस फॅमिली स्पा, सेंटरमध्ये ( हायस्ट्रिट मॉल, कापुरबावडी जंक्शन, ठाणे ) येथे छापा टाकला असता, तेथे एवलोन वेलनेस फॅमिली स्पा सेटरचे मालक सुंधाशु कुमार सिंग,एक महिला तसेच एवलोन वेलनेस फॅमिली स्पा मसाज सेटरचे चालक राहुल किसन गायकवाड, (19 वय रा. बरूवा हाऊस समोर, पातलीपाडा, ठाणे पश्चिम) एक महिला, (26 वय, रा. कल्याण पश्चिम) यांनी स्वतःचे आर्थिक फायदयाकरिता 7 पिडीत महिलांना मोठ्या स्वरूपाचे आर्थिक आमिष दाखवुन त्यांना मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसायाकरीता प्रवृत्त करून त्यांना एवलोन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर मध्ये येणारे गिऱ्हाईकांकडून प्रत्येकी पाच हजार रूपये रक्कम स्वीकारून, शरीर संबंध करण्यास भाग पाडुन त्यांची लैंगीक पिळवुणक करीत पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.एवलोन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर चे मालक व चालक यांचेविरूध्द कापुरबावडी पोलीस ठाणे येथे अनैतीक व्यापर प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 सह भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 143(1), 143 (2), 143 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयात राहुल किसन गायकवाड, आणि एक महिला यांना अटक करण्यात आली आहे. फरारी आरोपींचा शोध तसेच गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तारमळे, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे हे करीत आहेत. Thane Police Latest Crime News

पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तारमाले, पोलीस उपनिरीक्षक तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंराजपे, पोलीस शिपाई शेजवळ, हिवरे यांनी केली आहे. Thane Police Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0