मुंबई
Trending

Navi Mumbai CIDCO Land : अडीचशे कोटींची जमिन सिडकोला देण्यास नकार पेंधर ग्रामस्थांचा विरोध

पनवेल : पेंधर गावात Pendhar Village चारशे ते पाचशे कुळ असून त्यापैकी प्रत्येकाचा भाव अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र महसूल विभाग आणि सिडको मार्फत कुळांवर अन्याय करुन सावकार तसेच इतर महसूल अधिकारी हजारो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. ताब्यात असलेल्या कुळाच्या जमिनी इतरांच्या नावावर करुन सिडको व प्रशासन यात गोंधळ कारभार चालू आहे. आमच्या कुळहक्काच्या जमिनींचे संरक्षण करुन न्याय द्यावा अन्यथा सिडको समोर आमरण उपोषणास बसू असा इशारा पेंधर पो. नावडे, ता. पनवेल येथील मनोज गोपीनाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. Navi Mumbai CIDCO Land

मुंबई कुळवहिवाट शेतजमिन अधिनियम १९४८ कलम ३ अ प्रमाणे १९४८ मध्ये सर्व्हे नंबर २५४/७+८ संरक्षित कुळ म्हणून नोंद असलेली प्रत्यक्ष ताबा कब्जा वहिवाट आणि राहत असलेले घर क्रमांक ७७३ चे बाजारमुल्य अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र ही जमिन कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता प्रांताधिकारी, मेट्रो सेंटर पनवेल -३ सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ, तहसिलदार यांनी विष्णू जोमा म्हात्रे (नावडे), नारायण जोमा म्हात्रे यांच्या नावे करुन कुळाची फसवणूक करण्याचा प्रयत्न संगनमताने केला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवुन आमच्या कुळहक्काच्या जमिनी जबरदस्तीने ताबा मिळवू पाहणा-या सिडको, रस्त्याच्या ठेकेदारापासून संरक्षण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. जमिन कसणाऱ्या मागासवर्गीय कुळांवर महसूल विभाग व नगरविकास विभाग पुर्वीच्या उच्चवर्गीय खोतांप्रमाणेच अन्याय करत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी प्रबोधिनीचे नेते राजाराम पाटील हे पेंधर ग्रामस्थांसोबत उपोषणास बसणार आहे. Navi Mumbai CIDCO Land


कुळाच्या जमिनी परस्पर इतरांच्या नावावर करुन सिडकोने फसवणूक केली आहे. कुळकायदा नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. सिडको आणि तहसिलदारांकडून उरण, पनवेलमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. कुळकायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर अन्यायाविरुध्द आवाज उठविणार आहे.

  • राजाराम पाटील, शेतकरी प्रबोधिनी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0