मुंबई

Mumbai Crime News : 24 तासांत जबरी चोरी प्रकरणाचा छडा, सोन्याचे मंगळसूत्र व आरोपी जेरबंद

•स्प्रे मारून गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली ; भाईंदर पोलिसांचे कसून तपासकार्य, 1.14 लाखांचा मुद्देमाल जप्त

भाईंदर | भाईंदर पश्चिम येथील 16 माळा टॉवरजवळ एका महिलेला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला केवळ 24 तासांत अटक करून 25 ग्रॅम वजनाचे, 1.14 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात भाईंदर पोलिसांना यश आले आहे. आरोपीने आपल्या साथीदारासोबत मिळून फिर्यादी महिलेच्या डोळ्यांत स्प्रे मारून गळ्यातील चैन हिसकावली होती.

ही घटना 1 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला, तिची जाऊ आणि मुलगी मॅक्सेस मॉलकडे चालत जात असताना आरोपींनी मोटारसायकलवरून मागून येत हल्ला केला. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत घटनास्थळाचा बारकाईने तपास केला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून नालासोपारा (पूर्व) येथे सापळा रचून अनिल श्रीकृष्ण चौहान (वय 45) या मुख्य आरोपीला अटक केली.

तपासात चौहान याने गुन्हा विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन साथीदारासोबत केल्याची कबुली दिली. चौहानकडून पोलिसांनी सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेला पेपर स्प्रे आणि बजाज पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे करत आहेत.

हि कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोयले, अर्जुन जाधव, पोलीस हवालदार सुशिल पवार, सलमान पटवे, राजेश श्रीवास्तव, के. आर. पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, पोलीस शिपाई राहुल काटकर, श्रीराम वीर, चेतन गोरे, ओंकार पाठक यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0