Nana Kakde : मा. खासदार संजय नाना काकडे यांच्या पत्नी ऊषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Nana Kakade Latest News : रुबी रुग्णालयात दाखल : प्रकृती गंभीर
पुणे :- भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे MP Sanjay Kakade यांच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार चालू आहे. संजय काकडे हे नेहमी आपल्या वक्तव्यावरून चर्चेत असतात अनेक वर्षांपासून त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद चालू आहे. कौटुंबिक वादामुळे अनेक वेळा एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आले आहे. तसेच,त्यांची पत्नी उषा काकडे यांना काही वर्षांपूर्वी आर्थिक वादातून संजय काकडे यांनी आपल्या सख्ख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता.
कोण आहेत संजय काकडे?
संजय काकडे हे भाजपच्या पाठिंब्याने 2014 मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. अपक्ष म्हणून ते खासदारपदी निवडून आले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एप्रिल 2020 मध्ये त्यांच्या खासदारकीची मुदत संपली. काकडे हे व्यवसायाने रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.